अजित पवारांसोबत राहिला फक्त 1 आमदार; तिघेजण परतले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

राष्ट्रवादीच्या केवळ तीन आमदारांना घेऊन भाजपचे विमान दिल्लीला गेले होते. यातील तिन्ही आमदार नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि दौलत दरोडा रविवारी रात्री पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. आता फक्त पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे अजित पवारांसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासोबत आता फक्त एकच आमदार असल्याचे स्पष्ट झाले असून, तीन आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. आता स्वतःसह अवघ्या दोन आमदारांच्या जीवावार अजित पवारांचे बंड यशस्वी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधिमंडळ पक्षनेतेपदाचा पुरेपूर वापर करत 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भारतीय जनता पक्षाला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड मोडून काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे चित्र आहे. या 54 पैकी तब्बल 52 आमदारांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची हकालपट्‌टी करण्याचा ठराव संमत केला. यामुळे, अजित पवार यांचे बंड फसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

राष्ट्रवादीच्या केवळ तीन आमदारांना घेऊन भाजपचे विमान दिल्लीला गेले होते. यातील तिन्ही आमदार नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि दौलत दरोडा रविवारी रात्री पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. आता फक्त पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे अजित पवारांसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 

अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अकरा आमदार उपस्थित होते. मात्र, त्यापैकी नऊ आमदार परत शरद पवार यांच्याकडे आले असून, त्यांचा सर्वस्वी पाठिंबा शरद पवार घेतील त्या निर्णयाला राहील, अशी ग्वाही दिली होती. अजित पवार यांनी शपथविधीबाबत कोणतीही चर्चा केली नाही. फसवणूक करून शपथविधीला नेण्यात आल्याचे मत या आमदारांनी जाहीरपणे मांडले असल्याने अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार लगाम लावणार यावर राष्ट्रवादीचे नेते ठाम आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three ncp rebel mlas return in party only one mla support to Ajit Pawar