
राज्यात पडणाऱ्या पावसामुळे सागळीकडेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, मुंबई मध्ये आज दिवस भर कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, मुंबईत पुर्व द्रतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झालेली आहे, विक्रोळीजवळ खड्यांमुळे वाहतूक धिम्यागतीने होत आहे, सकाळी झालेल्या पावसामुळे अक्षरशा रस्ताची चाळण झाली आहे.
कामावरून सुटणाऱ्या चाकरमाने घराकडे परतत आहेत त्यांना याचा फटका बसत आहे. त्याच बरोबर ठाणे ,मुंबई उपनगर या भागातुन घरी जाण्यासाठी निघालेल्या लोकांना आतोनात याचा फटका बसत आहे. दरम्यान विक्रोळी ते घाटकोपर पर्यात वाहतुक कोंडी झाली आहे. तसेच आशी स्थिती कांजुरमार्ग ते विक्रोळी पर्यांत झाली आहे. कारण विक्रोळीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
या मुळे अतिशय धिम्या गतिने वाहतुक पुढे सरकत आहे. या रस्तांची मेंन्टेंस ची कामे MMRD आणि MSRDA या कंपन्यांकडे आहेत परंतु या रस्तांची कामे निकृस्ट दरर्जाची झाली असल्याचे प्रवासी सांगत आहेत. याचा फटका उद्या येणाऱ्या गोपाल पथकांना बसणार आहे, हे नक्की आहे त्याच बरोबर गणपतीसाठी गावाकडे जाणाऱ्या आणि याच रसत्यावरून गणपती घेवून जाताना लोकांना मोठा संर्घष करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.