

Tukaram Mundhe
Esakal
मुंबई : जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या बेकायदा औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून २०२६मध्ये राज्यभर विशेष मोहीम राबवत ३४ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ४.१२ कोटी किमतीची बेकायदा औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय साहित्यावर नियामक कारवाई करण्यात आली. तसेच नऊ गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.