

Tukaram Mundhe on AI
esakal
अमरावती: सध्याच्या काळात जेनझींवर अर्थात तरुणाईवर भरकटल्याचा आरोप केला जातो, मात्र हे सत्य नाही. वास्तविक याच तरुणाईमध्ये विविध प्रकारचे कौशल्य आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांच्यामधील नैराश्य, न्यूनगंड समाजाने समजून घेऊन त्यांना योग्य ती दिशा दाखविणे देशाच्या दृष्टीने उपयोगाचे आहे, असे प्रतिपादन आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. स्थानिक पी. आर. पोटे शैक्षणिक परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात खादी व ग्रामोद्योगाच्या कस्तुरबा खादी महिला समितीच्या वतीने शनिवारी (ता. १) आयोजित ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.