Milk Adulteration Raid
esakal
सिन्नर : तालुक्यात दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी (ता. ४) मोठी धडक कारवाई करत चार दूध संकलन व प्रक्रिया केंद्रांवर एकाचवेळी छापे टाकले. दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईत भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याची प्राथमिक माहिती असून, रात्री उशिरापर्यंत तपास आणि चौकशी सुरू होती. तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.