

Tukaram Munde Robbery Case
esakal
Thane robbery news : घरात झोपलेल्या व्यक्तीला स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून, हात-पाय बांधत लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. दिव्यातील तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यातील दोन लाख ३९ हजार रुपयांच्या दरोड्यासह मुंब्रा, टिटवाळा, वाशिंद आणि कुळगाव-बदलापूर परिसरातील बंगले व फार्म हाऊसवर टाकलेल्या सात दरोड्यांचा या कारवाईत छडा लागला आहे. विजय चव्हाण (४५) याच्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.