

Tukaram Mundhe Pune Food Adulteration
esakal
Pune Food Safety Drive : अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २ कोटी २३ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच २३ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, पुण्यातील जे. एम. रोडवरील खाऊ गल्लीत आठ विनानोंदणी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद करण्यात आला आहे.