Tukaram Mundhe यांची बदली का रखडली? पडद्यामागे काय घडतंय? नाशिक कुंभमेळ्याशी काय संबंध अन् सरकारमधील कोणाचा विरोध?

Why Tukaram Mundhe’s transfer was put on hold amid Nashik Kumbh planning and political concerns : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांची बदली रखडली, राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना उधाण
Tukaram Mundhe Transfer on Hold: Is Nashik Kumbh and Political Pressure the Real Reason?

Tukaram Mundhe Transfer on Hold: Is Nashik Kumbh and Political Pressure the Real Reason?

esakal

Updated on

महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘मिस्टर क्लीन’ आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या २००५ बॅचच्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली अचानक थांबवण्यात आल्याने प्रशासन वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ३१ मार्च २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवपदावरून त्यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच ही बदली ‘होल्ड’वर ठेवण्यात आली. त्यामुळे मुंढे यांना अद्याप नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारता आलेली नाहीत. या प्रकरणामागे नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्याशी संबंधित राजकीय आणि आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com