esakal | जॉर्जियात अडकले महाराष्ट्रातले 200 विद्यार्थी; 'या' नैसर्गिक संकटाची पडली भर!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Students

शहरातील सर्व मॉल, हॉटेल्स बंद असल्याने या विद्यार्थ्यांची खाण्या-पिण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट परसली आहे.

जॉर्जियात अडकले महाराष्ट्रातले 200 विद्यार्थी; 'या' नैसर्गिक संकटाची पडली भर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Coronavirus : नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जॉर्जिया देशात अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी जॉर्जियातील टिबिलिसी शहरात गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमानसेवा बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचे मायदेशी परतण्याचे सर्व मार्गदेखील बंद झाले असून, त्यांची त्या ठिकाणी मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तत्काळ मायदेशी आणण्यासाठी कारवाई करण्याची मागणी पालक व विद्यार्थीवर्गाकडून होत आहे. 

- Coronavirus : चीनने मागितली माफी; पण कोणाची?

कोरोना विषाणूने जगातील 172 देशांत थैमान घातले आहे. जॉर्जिया या देशातदेखील 47 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, 1900 नागरिक कॉरंटाइनमध्ये; तर 300 नागरिकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, याच जॉर्जियातील टिबिलिसी शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. 

- Coronavirus : राज्यातील चाचणीचे निकष बदलले; दिवसभरात रुग्णांची संख्या पोहोचली...

जॉर्जियातील हवामानात बदल झाल्याने त्या ठिकाणी बर्फ पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अघोषित बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, तेथील विमानसेवादेखील पूर्णत: बंद करण्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांचे मायदेशी परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचा जॉर्जिया देशातील नागरिकांचा समज झाल्याने त्या ठिकाणी असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत नसल्याचे त्या ठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

शहरातील सर्व मॉल, हॉटेल्स बंद असल्याने या विद्यार्थ्यांची खाण्या-पिण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट परसली आहे. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय व विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून मायदेशी परण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे.