Maratha Reservation वरून राजकारण करणाऱ्यांनी आरशासमोर उभं राहून..; शरद पवार, उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले उदयनराजे?

आरक्षणाबाबत झालेल्‍या चुकांची वस्‍तुस्‍थिती आपण नाकारू शकत नाही.
Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackerayesakal
Summary

मराठा आरक्षण मुद्द्यावर दोन-तीन दिवस गैरसमज पसरविण्‍यात येत आहेत. आरक्षणाबाबत न्‍यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

सातारा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील आंदोलनावेळी घडलेल्‍या घटनेचा निषेध करत न्‍यायालयीन चौकशीची मी मागणी केली आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखील तीच भूमिका आहे. काहीजण या मुद्द्यावर कारण नसताना केवळ राजकारण करत असून, त्‍यांनी ते करू नये, असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
Bhokardan Bandh : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; कारनंतर आता भररस्त्यात स्वत:ची दुचाकी जाळत सरकारला दिला इशारा

दरम्यान, आरक्षणाच्‍या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी आरशासमोर उभे राहून स्‍वत:ला काही प्रश्‍‍न विचारावेत, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचा नामोल्लेख न करता केली.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणस्थळी पोलिसांनी केलेला लाठीहल्‍ला, गोळीबाराच्‍या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच आरक्षणाबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयात सुरू असणारी प्रक्रिया तसेच मराठा आरक्षण उपसमितीच्‍या वतीने सुरू असणाऱ्या प्रयत्‍नांबाबत माहिती देण्‍यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.

Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
Shambhuraj Desai : 'मराठा समाजानं शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये'; उदनराजेंच्या भेटीदरम्यान मंत्री देसाईंचं आवाहन

यावेळी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, इतिहास संशोधक व मराठा आरक्षण अभ्‍यासक चंद्रकांत पाटील आदी उपस्‍थित होते. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेली न्‍यायालयीन प्रक्रिया, उपसमितीचे प्रयत्‍न, क्‍युरेटिव्‍ह पिटीशनमध्‍ये नव्‍याने समाविष्‍ट करावयाच्‍या बाबींच्‍या अनुषंगाने शंभूराज देसाई व उदयनराजे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मराठा आंदोलन व आरक्षणाच्या अनुषंगाने उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्‍हणाले, ‘‘आरक्षणाच्‍या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल, यासाठी एकत्र येणे आवश्‍‍यक आहे. आरक्षणावर जे आता बोलत आहेत, जे राजकारण करत आहेत. त्‍यांनी ते थांबवणे आवश्‍‍यक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सगळ्यांची इच्‍छा आहे.’’

Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
Kolhapur Bandh : मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज बंद; सर्व शाळांना सुटी जाहीर

अंतरवाली सराटी येथील घटनेच्‍या अनुषंगाने कोण काय बोलत आहे, त्‍यावर मी बोलणार नाही. कारण प्रत्‍येकजण निवडणुका नजरेसमोर ठेवत मांडणी करणार; पण राजकारणापेक्षा मराठा समाजाची परिस्‍थिती तुम्‍ही बघा. त्‍यावेळी मविआने काही बाबी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून देणे आवश्‍‍यक होते. मराठा समाजातील लोकप्रतिनिधी बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. मराठा समाज दारिद्र्यरेषेखालीच आहे.

मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांच्‍या मुद्द्यावर दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अन्य समाजाप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळावा, अशी भूमिका मी काल मांडली होती. तीच भूमिका कायम आहे. आरक्षणाच्‍या रिव्ह्यू पिटीशनकडे त्‍यावेळच्‍या लोकांनी दुर्लक्ष केल्‍याने ती सर्वोच्‍च न्‍यायालयात टिकली नाही. आरक्षणाबाबत झालेल्‍या चुकांची वस्‍तुस्‍थिती आपण नाकारू शकत नाही.

Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
Jalna Maratha Andolan : लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात कडकडीत बंद; एसटीच्या तब्बल 634 फेऱ्या रद्द, मतदानावर बहिष्काराचा इशारा

सविस्‍तर अभ्‍यास, चर्चेअंती रिव्ह्यू पिटीशन दाखल होणे आवश्‍‍यक होते. मात्र, तसे झाले नाही व ती टिकली नाही. याच अनुषंगाने क्‍युरेटिव्‍ह पिटीशन सर्वोच्‍च न्‍यायालयात असून, त्‍यात आम्‍ही सर्वांनी पूर्ण ताकदीने लक्ष घातले आहे.’’

शंभूराज देसाई म्‍हणाले, ‘‘मराठा आरक्षण मुद्द्यावर दोन-तीन दिवस गैरसमज पसरविण्‍यात येत आहेत. आरक्षणाबाबत न्‍यायालयीन प्रक्रिया सुरू असून, गतकाळात आपल्‍या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देत ते न्‍यायालयात टिकवले. नंतरच्‍या मविआ सरकारचे रिव्ह्यू पिटीशन न्‍यायालयाने नाकारले. यानंतर पुन्‍हा क्‍युरेटिव्‍ह पिटीशन दाखल केले असून, त्‍यासाठी माजी न्‍यायमूर्ती व कायदेतज्ज्ञांची मदत घेण्‍यात येत आहे.

Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
Ramdas Athawale : आंबेडकरांचे संविधान कोणालाही बदलू देणार नाही आणि कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर..; आठवलेंचा स्पष्ट इशारा

आरक्षण समितीचा मी सदस्‍य व राज्‍याचा मंत्री असून, याबाबतच्‍या न्‍यायालयीन प्रक्रियेची माहिती मी खासदार उदयनराजेंना दिली आहे. दाखल क्‍युरेटिव्‍ह पिटीशनमध्‍ये नव्‍याने काही बाबी समावेश करण्‍यात येत असून, त्‍यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्‍ला घेण्‍यात येत आहे. या क्‍युरेटिव्‍ह पिटीशनमध्‍ये यश मिळणार असून, त्‍यासाठी राज्‍य सरकारचे प्रयत्‍न सुरू आहेत.’’

मनोज जरांगे-पाटील व इतर आंदोलकांशी काल उदयनराजे बोलले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज फोनवरून उदयनराजेंशी देखील चर्चा केली आहे. आरक्षण मिळवण्‍यासाठी सरकार आग्रही असून, त्‍यासाठी जे जे करावे लागेल ते करण्‍यात येत असल्‍याचेही यावेळी शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Udayanraje Bhosale Sharad Pawar Uddhav Thackeray
मोठी बातमी! मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सिद्धरामय्या राष्ट्रीय राजकारणात करणार एन्ट्री? म्हैसूरमधून लोकसभा लढवण्याची सूचना

सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल क्‍युरेटिव्‍ह पिटीशनमधील त्रुटी दूर करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्‍यासाठी आम्‍ही सर्वजण प्रयत्‍नशील असून, त्‍यात यश मिळेल.

- उदयनराजे भोसले, खासदार

जनतेने अफवांवर विश्‍‍वास न ठेवता चिथावणी देणाऱ्यांना बळी न पडता सरकारला सहकार्य करावे. आरक्षणाच्‍या मुद्द्यावर नव्‍याने काही अभ्‍यासकांचा समावेश सरकारकडून करण्‍यात येईल.

-शंभूराज देसाई, पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com