Jalna Maratha Andolan : लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात कडकडीत बंद; एसटीच्या तब्बल 634 फेऱ्या रद्द, मतदानावर बहिष्काराचा इशारा

सातारा जिल्हा बंदची हाक दिल्याने जिल्हाभरात एसटीच्या ६३४ फेऱ्या रद्द झाल्या.
Satara Karad Bandh Jalna Maratha Andolan
Satara Karad Bandh Jalna Maratha Andolanesakal
Summary

जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत अधिकृत पत्र काढले नव्हते. मात्र, रिक्षा व स्कूल बसचालक संपात सहभागी झाले होते.

सातारा : अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या (Jalna Maratha Andolan) निषेधार्थ पुकारलेल्या ‘जिल्हा बंद’ला (Satara Bandh) नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. संपूर्ण जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होते. दहिवडी, वडूज, कोरेगाव व शिरवळला मोर्चे काढण्यात आले.

फलटण, मेढा येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला. आरक्षणाबाबत राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या फसवणुकीबाबतची खदखद आजच्या कडकडीत ‘बंद’च्या माध्यमातून व्यक्त झाली. शासनाने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, लाठीहल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आज जोरकसपणे करण्यात आली.

Satara Karad Bandh Jalna Maratha Andolan
Hasan Mushrif : शरद पवारांनी भाजपला आव्‍हान देताच मुश्रीफ म्हणाले, 'त्यातही आम्हाला क्‍लीन चिट मिळणार'

आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा फलटण येथील आंदोलनात देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ‘जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध नोंदविला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी सर्व ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता; परंतु कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. दहिवडीत मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी दहिवडी चौकात सुमारे तीन तास ठिय्या आंदोलनही केले. येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली.

Satara Karad Bandh Jalna Maratha Andolan
Maratha Reservation : अतिरेक झाला की उद्रेक होणारच, मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘जब जब देवेंद्र डरता है... तब तब पुलिस को आगे करता है,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचं’, ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या,’ आदी घोषणा देण्यात आल्या. फलटणमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसीतून टिकणारे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी शपथ घेण्यात आली.

आंदोलकांनी चौकामध्ये चारही बाजूने ठिय्या मांडून या मध्यवर्ती व वर्दळीच्या चौकातील वाहतूक रोखून धरली. ‘बंद’ला खंडाळा व शिरवळ शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. शिरवळ येथे शिवाजी चौकात एकत्र जमून शहरातील मुख्य रस्त्याने भगवे झेंडे घेऊन मूक मोर्चा काढण्यात आला. लोणंद मराठा समाज मंडळाने केलेल्या आवाहनाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निषेध मोर्चाही काढण्यात आला. कोरेगावमध्ये ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध करणारे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हल्ल्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे, मराठा समाज आरक्षणाचा विषय तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.

Satara Karad Bandh Jalna Maratha Andolan
Bhokardan Bandh : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; कारनंतर आता भररस्त्यात स्वत:ची दुचाकी जाळत सरकारला दिला इशारा

वडूज येथेही कडकडीत ‘बंद’ पाळत निषेध व्यक्त करण्यात आला. तीन तास ठिय्या आंदोलन करून निवेदन करण्यात आले. येथे अत्यावश्यक सेवा वगळता येथील बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने, मंडई बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. मायणी गावातून विविध घोषणा मुख्य रस्त्याने फेरी काढली गेली. चांदणी चौकात सर्व जण एकत्र आले. तेथे सभेचे आयोजन करण्यात आले.

जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा शहरात सुद्धा बंदला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मेढ्यात रास्ता रोको आंदोलन करत तहसीलदार व सहायक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सातारा शहरातही नागरिकांनी शंभर टक्के बंद पाळला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकाळी पोवई नाक्यावर निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली.

Satara Karad Bandh Jalna Maratha Andolan
Shambhuraj Desai : 'मराठा समाजानं शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये'; उदनराजेंच्या भेटीदरम्यान मंत्री देसाईंचं आवाहन

एसटीच्या ६३४ फेऱ्या रद्द

सातारा जिल्हा बंदची हाक दिल्याने जिल्हाभरात एसटीच्या ६३४ फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील विविध डेपोंमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याचे दिसून आले. सायंकाळी सहानंतर ग्रामीण भागातील फेऱ्या काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या. याचबरोबर मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतील एसटी सातारा बायपासमार्गे जात होत्या.

बहुतांश शाळा, महाविद्यालये बंद

जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत अधिकृत पत्र काढले नव्हते. मात्र, रिक्षा व स्कूल बसचालक संपात सहभागी झाले होते. याचबरोबर बहुतांश पालकांनी स्वत:हून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नसल्याने शाळा व महाविद्यालये बंद असल्याचे दिसून आले, तसेच काही खासगी संस्थाचालकांनी रविवारी रात्री उशिरा बैठका घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Satara Karad Bandh Jalna Maratha Andolan
Kolhapur Bandh : मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज बंद; सर्व शाळांना सुटी जाहीर
  • जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद

  • एसटीच्या ६३४ फेऱ्या रद्द

  • मायणी व लोणंदमध्येही मोर्चा

  • मराठा आरक्षणास जिल्हा बार असोसिएशन, मराठा बिझनेसमन फोरम व सीएमएसचा पाठिंबा

  • जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  • वाई व महाबळेश्वरमध्ये आज बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com