
Uddhav Thackeray addressing the Dussehra rally at Shivaji Park, launching a sharp attack on BJP over Mumbai BMC elections and Adani’s role in politics.
esakal
Summary
भाजप निवडणुकीत पुन्हा हिंदू-मुस्लिम राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण – राष्ट्रधर्म हाच खरा धर्म असल्याचे ते म्हणाले.
हिंदुत्वाबाबत भाजपवर उलट टीका करत "फडक्यावरचा हिरवा रंग काढा" असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांबाबत भाजपवर हल्लाबोल केला. तुम्ही निवडणुका घेऊन बघाच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवायला तयार आहे. भाजपच्या हातात मुंबई दिली तर ते अदानीच्या पायावर समर्पित करतील. तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे बघत आहात आम्ही जीव म्हणून बघतोय असा हल्लाबोल त्यांनी केला.