Uddhav Thackeray : भाजपला कळत नाहीये, जेवढं अडचणीत आणलं जाईल...; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

Devendra Fadnavis and uddhav thackeray
Devendra Fadnavis and uddhav thackerayDevendra Fadnavis and uddhav thackeray

मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आज शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मुंबईत अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Devendra Fadnavis and uddhav thackeray
Uddhav Thackeray : चोरांना धडा शिकवणार ; उद्धव ठाकरेंचें शक्तिप्रदर्शन, शिंदेंवर घणाघात!

भास्कर जाधव म्हणाले की, आमचे नेते, उपनेते, आमदार-खासदार यांची बैठक उद्धव साहेबांनी बोलवली होती. मात्र हजारो लोक मातोश्रीसमोर गोळा झाले होते. उद्धवसाहेबांना पाठिंबा देण्यासाठीच ही गर्दी झाली होती. आम्हीच लोकांना विनंती केली की, तुम्ही घरी जा. अखेरीस उद्धव ठाकरे यांनी गाडीवर उभं राहून सर्वांना धान्यवाद दिले. मी लढाई करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचं जाधव म्हणाले.

Devendra Fadnavis and uddhav thackeray
Shivsena Row : 'शिवसेना' व धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार का? अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणतात...

उद्धव ठाकरेंना छळण्याचं, घेऱण्याचं आणि त्रास देण्याचं सातत्याने काम सुरू आहे. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र तेवढाचं मराठी माणूस, सर्व जातीधर्माचे लोक, नॉन मराठी माणूस उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी जमा झाली होत आहेत. लोक घोषणा देत होते, की आम्ही तुमच्या सोबत आहोत. भाजपला हेच कळत नाही की, उद्धव यांचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते आणखी ताकदीने त्यांच्यास पाठिशी उभे राहात आहेत, असं जाधव यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे ईडीला घरगडी म्हणाले, निवडणूक आयोगाला गुलाम म्हणाले काय चुकलं त्यात. अंधेरी पोटनिवडणूक लागली. तरी आमचं धनुष्यबाण गोठवलं. त्यांना वेगळ्या पक्षाचं नाव दिलं. आमचं चिन्ह दिलं. बंडखोरी केलेल्या गटाला कधीही जुनं पक्षचिन्ह किंवा नाव दिलं जात नाही. तरी निवडणूक आयोगाने ते केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्याचं जाधव म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com