

Uddhav Thackeray
esakal
Shivsena Uddhav Thackeray : भाजप आणि शिंदे यांच्यात बाचाबाची सुरू झाल्याने काही लोक आता मूळ शिवसेनेत येत आहेत. भविष्यातही अनेकांचा शिवसेनेत प्रवेश होईल. गद्दारांचा बुडबुडा आता फुटला आहे. शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. ठाणे, सानपाडा या भागातील काही शिवसैनिकांनी प्रवेश केला. पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.