Vidhan Sabha 2019 : वसंतदादांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही : उद्धव ठाकरे

टीम ई-सकाळ
Thursday, 10 October 2019

- महाराष्ट्रात सरकार आपलंच असेल.

- या निवडणुकीत चमत्कार करून दाखवेन.

वैजापूर : महाराष्ट्रात सरकार आपलंच असेल. या निवडणुकीत चमत्कार करून दाखवेन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच वसंतदादांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. 

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घनसावंगी येथे जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकलाच पाहिजे. शिवसेना-भाजप ही युती असून, निवडणुकीनंतर नेता कोण हे स्पष्ट होणार आहे.

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणाले, 'शरद पवारांची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी!'

दरम्यान, आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मी हे सरकार घालवीन असे शरद पवार म्हणाले होते. मात्र, वसंतदादा पाटील यांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

स्वर्गाची दारं पर्यटकांसाठी पुन्हा खुली; पर्यटकांसाठी काश्मीर खुलं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Criticizes on NCP Chief Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha