शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing

शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या संदर्भातील सुनावणी उद्या होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं समजतं. तसेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण करणही पुढं आलं आहे.

हेही वाचा: उद्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची होणारी सुनावणी आता उद्या होणार नसून परवा होणार आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तिसरे न्यायमूर्ती उपस्थित नसल्यामुळं सुनावणी पुढे ढकलल्याचं समोर आलं आहे.

Web Title: Uddhav Thackeray Eknath Shinde Group Supreme Court Hearing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..