Uddhav Thackeray : हे तीन चिन्हं बघा... उद्धव ठाकरेंनी चिन्हंच समोर ठेवली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray LIVE

Uddhav Thackeray: हे तीन चिन्हं बघा... उद्धव ठाकरेंनी चिन्हंच समोर ठेवली!

मुंबईः निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांचं नाव न घेता जनतेत जावून दाखवा, तुम्ही शिवसैनिकांना छळता जराही माणुसकी शिल्लक आहे का? असा सवाल उपस्थित करुन 'हे अती होतंय' असा सज्जड दमही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

रविवारी सायंकाळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील त्यांनी दाखवून दिले. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी डगमगणारा नाही, लढणारा आहे. असं म्हणत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ताकदीने लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन करत आमचं नाव आणि चिन्हं आम्हाला तातडीने द्या, असं सांगितलं.

हेही वाचा: Uddhav Thackeray : आता बास अति होतंय, उद्धव ठाकरे संतापले!

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होऊ नये, यासाठीही प्रयत्न झाले. शेवटी न्यायदेवता 'न्याय' या शब्दाला जागले आणि न्याय दिला. हा सामान्यांचा मेळावा होता. शेवटी उद्धव ठाकरे म्हणजे कोण? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यामुळे मला महत्त्व आहे. शिवसेनेसाठी अनेकांनी जिव दिलेला आहे. अनेकांनी तरुंगवास भोगला. परंतु मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा कायम ठेवला. आजही मी लढणार आहे. कारण माझा संघर्षाचा वारसा आहे, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं ठाकरे शेवटी म्हणाले.