
Osho Ashram Pune : पुण्यातील ओशो आश्रमाबाहेरचं आंदोलन भोवल! १२५ आनुयायांवर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील ओशो आश्रमाच्या बाहेर आनुयायानी केलंलं आंदोलन त्यांना भोवलं आहे, या आंदोलन प्रकरणी १०० ते १२५ ओशो अनुयायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये ओशो भक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काल ओशो आश्रमाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत ओशो आश्रमात शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर आत जात असतानाच भक्तांकडून सूरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली होती.
त्यानंतर आता ओशो आश्रमाच्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून शंभर ते 125 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
पुण्यातील ओशो आश्रमात काल राडा झाला होता. तसेच ओशोंच्या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यानं या अनुयायांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळं आंदोलन करणारे हे अनुयायी आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं. आश्रमाच्या मालकीवरुन त्यांचे अनुयायी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ओशो आश्रम प्रशासन आणि ओशोच्या अनुयायांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. पण अनुयायांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळं बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं पुण्यातील ओशो आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ओशोंचे अनुयायी आश्रमाजवळ गोळा झाल्यानं परिस्थिती चिघळली, तसेच त्यांनी सुरक्षारक्षकांना डावलून आश्रमात प्रवेश केल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यात देखील घेतलं.
आंदोलन कशासाठी सुरु?
ओशो आश्रमात होत असलेल्या भ्रष्टाराच्याविरोधात ओशोंच्या अनुयायांकडून आंदोलन सुरु आहे. तसेच या अनुयायांना आश्रमात जाऊ दिलं जात नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून आश्रमाबाहेर त्यांचं आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काल त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते.