Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का, 17 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

Uddhav Thackeray:
Uddhav Thackeray:

Uddhav Thackeray: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे पक्षाचा विस्तार वढवण्यासाठी राज्यात दौरे करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत त्यांना धक्के बसत आहेत. ठाकरे गटाच्या आजी-माजी 17 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक 79 चे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सदानंद वामन परब आज शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार. तसचे ठाकरे गटातून 17 आजी-माजी नगरसेवक आज शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे.

मुंबईतून ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक

1. शीतल म्हात्रे
2. यशवंत जाधव
3. सुवर्णा कारंजपे
4. परमेश्वर कदम
5. वैशाली शेवाळे
6. दिलीप लांडे (नगरसेवक + आमदार)
7. मानसी दळवी
8. किरण लांडगे (अपक्ष परंतु शिवसेनेला पाठिंबा दिला होता, आता शिंदे गटात)
9. समाधान सरवणकर
10. अमेय घोले
11. संतोष खरात
12. दत्ता नरवणकर
13. सान्वी तांडेल (अपक्ष परंतु शिवसेनेला पाठिंबा दिला होता, आता शिंदे गटात)
14. आत्माराम चाचे
15. चंद्रावती मोरे
16. संजय अगलदरे
17. सदानंद वामन परब

Uddhav Thackeray:
Primary Teacher : राज्य सरकारचं अजब शिक्षक धोरण! तरुण ठेवले बाजूला निवृत्तांना सेवेत घेणार

महाराष्ट्रात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये उद्धव ठाकरेंची देखील चिंता वाढत आहे. यापूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम  गोऱ्हे   यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केला.

नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नेत्या आहेत. 2002 पासून त्या सातत्याने विधान परिषदेवर निवडून येत आहेत.

नीलम गोऱ्हे  या 2002, 2008, 2014 आणि 2020 मध्ये चार वेळा विधान परिषदेवर निवडून आल्या होत्या. 7 जुलै 2022 पासून त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.

Uddhav Thackeray:
Cabinet Expansion: बंगले मिळाले पण खातं मिळेना, भाजपने शब्द फिरवला?; अजित पवार गटात अस्वस्थता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com