Uddhav Thackeray interview
Uddhav Thackeray interview esakal

केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे विरोधकांचं आयुष्य बरबाद करण्याचं षडयंत्र- उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.
Published on

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मनाली अनेक खंत बोलून दाखवत आरोपांच्या फैरी झाडल्या. दरम्यान, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.(Uddhav Thackeray interview central investigation agencies Sanjay Raut)

Uddhav Thackeray interview
फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्याबद्दल ठाकरे म्हणतात; 'त्यांच्याबरोबर असं...'

केंद्रीय तपास यंत्रणेबद्दल काही वेळेला न्यायालयाने सुद्धा आपली मत नोंदवलेली आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं आहे की, त्यांच्या एका महत्त्वाच्या नेत्याला अटक होण्याची शक्यता आहे. मनीष सिसोदियांना खोट्या आरोपाखाली अटक होण्याची शक्यता आहे. कालांतराने त्यातून ते सुटतील. पण तोपर्यंत त्यांचा आयुष्य तुम्ही बरबाद केलेलं असतं.

असं कुणाचं आयुष्य बरबाद करून कुणाला सुख मिळेल असे मला वाटत नाही. अशी लोकं कधी सुखात राहू शकतात यावर माझा विश्वास नाही. देशात लोकशाही आहे. तुम्ही काय बोलायचं ते बोला, आम्ही काय बोलायचं ते बोलू. मात्र आत्ता ज्या पद्धतीने बदनामीकरण चाललेलं आहे, ते अत्यंत घाणेरड्या आणि विकृत भाषेत चाललेलं आहे. हे लाभणार नाही कुणाला. जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यावर आरोप करायचे, त्यानंतर त्यांना कुंभमेळ्याला न्यायचं.

Uddhav Thackeray interview
MP : ग्राहकाला आले तब्बल 3, 419 कोटी रुपयांचे वीजबील, रक्कम पाहिल्यावर थेट रुग्णालयात दाखल

नितीन गडकरी मागे बोलले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. ज्या लोकांवर आरोप होते ते लोक त्यांच्यामध्ये गेले आहेत. त्या लोकांचं पुढे काय होतं तेही सोडून द्या. पण नवीन नवीन लोकांना त्रास द्यायचा हे चांगल्या सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com