Thackeray-Ambedkar Alliance: ठाकरे-आंबेडकर येणार एकत्र; राज्यात नव्या युतीचे संकेत

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक नव्या युतीचं रुप पहायला मिळू शकतं.
Thakceray_Ambedkar
Thakceray_Ambedkar

मुंबई : राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक नव्या युतीचं रुप पहायला मिळू शकतं. त्यानुसार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Uddhav Thackeray Prakash Ambedkar will come together Signs of a new alliance in the Maharashtra)

Thakceray_Ambedkar
Mumbai News : मॉलमध्ये खेळताना घडला अनर्थ, चिमुरडीचा मृत्यू!

सुत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची फोनवरून चर्चा झाली असून येत्या 20 किंवा 21 तारखेला एकत्र येऊन ते युतीबाबत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत महत्वाची घोषणा होऊ शकते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता नवीन युतीचा प्रयोग पाहायला मिळणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

Thakceray_Ambedkar
Sambhaji Bhide :"कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो"; संभाजी भिडेंकडून पत्रकार महिलेचा अपमान

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला जवळ करणाऱ्या भाजपविरोधात उद्धव ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता भाजप राज्यात एकटा पडला असून या पक्षाविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे यापूर्वीच एकत्र आलेत. पण नुकतीच संभाजी ब्रिगेडनं देखील शिवसेनेशी युती केली असून आता वंचितही याच दिशेने जात असल्यानं उद्धव ठाकरेंना अधिक बळ मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com