मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना दणका; आरे कारशेडला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला असून आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती त्यांनीच पत्रकार परिषदेत दिली. पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला असून आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती त्यांनीच पत्रकार परिषदेत दिली. पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विधीमंडळ पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केलं नाही हे सगळ्या पत्रकारांना माहित आहे. मी काहीही न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपची नवी खेळी; राणेंना देणार ही जबाबदारी

मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असंही प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मोठी आव्हानं पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारलं असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांना जिवंत जाळण्याची धमकी !

दरम्यान, काल (ता. २८) शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Press Conference After Take Charge Of Chief Minister