मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोडले 'हे' पद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

उद्धव ठाकरे आज मुंबईत शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे. 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राचे संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याजागी कार्यकारी संपादक संजय राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्धव ठाकरे आज मुंबईत शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे. एकाच वेळी दोन पदांवर राहु शकत नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे. 

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray quit Saamana editor position before accepting the responsibility of Chief Minister