

Uddhav Thackeray Hits Back at Fadnavis Over Mayor Remark
esakal
Devendra Fadnavis Statement Mayor : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मराठी हिंदू महापौर होणार” अशी केलेली घोषणा ही फसवी व दुटप्पी असल्याची जोरदार टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. वरळी डोममध्ये झालेल्या कार्यक्रमावर निशाणा साधताना ते म्हणाले, “तिथे डोंबकावळे जमले होते. कालच्या डोममध्ये शिवसेनेतील गद्दार गेले होते. त्यांना शिवसेनेने मोठे केले; मग ते कोण आहेत, कोणत्या धर्माचे आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना भवनात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा वचननामा सादरीकरण करण्यात आला. यावेळी राज ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच शरद पवार पक्षाकडून आलेल्या प्रतिनिधींनी वचननामा सादर केला.