तेजस ठाकरे सेना तारणार? बाळासाहेबांनी अनेक वर्षांपूर्वीच सांगितलं होतं...

तेजसची तोडफोड सेना आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
Aditya Thackeray balasaheb thackeray Tejas thackeray
Aditya Thackeray balasaheb thackeray Tejas thackeraySakal
Updated on

शिवसेनेचा अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष सध्या सुरू आहे. शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरेंचे दुसरे पुत्र तेजस ठाकरेही आता आपल्या परिवाराच्या मदतीसाठी राजकीय रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षांपूर्वीच दिले होते. (Uddhav Thackeray's son Aditya and Tejas)

Aditya Thackeray balasaheb thackeray Tejas thackeray
उद्धव काढणार 'हुकमी एक्का'; तेजस ठाकरे घेणार आदित्य यांची जागा?

जेव्हा आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) राजकारणात अधिकृत प्रवेश झाला होता, त्यावेळचं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये तेजस आपल्यासारखाच असल्याचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, आदित्य हा शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. पण तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याची सेना ही तोडफोड सेना असेल."

Aditya Thackeray balasaheb thackeray Tejas thackeray
ठाकरे कुटुंबीयांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदारांचे शिंदेंनी कान टोचले

या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणतात की, उद्धवचा दुसरा मुलगा तेजस अगदी माझ्यासारखा आहे. मला प्राणी आवडतात, त्यालाही प्राणी आवडतात. एकदा तो मला म्हणाला की, मला तुमची सेना वगैरे काही आवडत नाही. मी माझी सेना काढलीये. मी म्हटलं काय बाबा, कोणती सेना काढलीस, त्यावर तो म्हणे तोडफोड सेना. त्याचं त्यानंच नाव ठरवलं आणि तो एकटाच असतो.

Aditya Thackeray balasaheb thackeray Tejas thackeray
EKnath Shinde: ठाकरे गट व शिवसेना दोन्ही वेगळे; CM शिंदेंच्या ट्वीटची चर्चा

शिवसेनेच्या (Shivsena) बाबतीत आत्ता संघर्षाचा आणि अटीतटीचा काळ सध्या सुरू आहे. या काळात आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करतायत, शिवसैनिकांना बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत. त्यातच आता आपल्या परिवाराची साथ द्यायला जीवशास्त्रात रमणारे तेजस ठाकरेही उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या या जुन्या व्हिडीओमुळे या चर्चांना हवा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com