महाविकासआघाडीचा भाजपनेत्यांना पहिला दणका; घेतला 'हा' मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

भाजप संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्याच्या  310 कोटींच्या हमीचा निर्णय महाविकास आघाडीने रद्द केला असून हा भाजपनेत्यांसाठी मोठा झटका आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे व सोलापूर जिल्हातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने ३१० कोटी रुपयांची बँकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय महाविकासआघाडीच्या सरकारने रद्द करण्याचे ठरवले आहे.

मुंबई : भाजप संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्याच्या  310 कोटींच्या हमीचा निर्णय महाविकास आघाडीने रद्द केला असून हा भाजपनेत्यांसाठी मोठा झटका आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे व सोलापूर जिल्हातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने ३१० कोटी रुपयांची बँकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय महाविकासआघाडीच्या सरकारने रद्द करण्याचे ठरवले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून भाजप सरकारच्या निर्णयाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. काल (ता.०४) या चार साखर कारखान्यांना केलेल्या मदतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालिन सरकारने मदत केली होती.

शरद पवारांभोवतीच्या 'खंजीराची जन्मकथा'

पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब वारणा साखर कारखाना व काँग्रेसमधून भाजपत गेलेले कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना हमी देण्यात आली होती. ही हमी अनुक्रमे ५० कोटी, ५ कोटी, १०० कोटी आणि ७५ कोटी रुपये इतकी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav thackeray stay on rural development work which sanctioned by BJP Goverment