Eknath Shinde : ठाणे महापालिकेचा महापौर शिवसेनेचा नव्हे तर, 'शिंदे'सेनेचा | Thane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Corporation

Eknath Shinde : ठाणे महापालिकेचा महापौर शिवसेनेचा नव्हे तर, 'शिंदे'सेनेचा

मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे राज्यात सत्तांतर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिवसेनेला (Shivsena) ठाण्यात आणखी एक जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के (Thane Mayor) यांनी एक ट्वीट करत एक सूचक इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्वीटनुसार आगामी काळात होऊ घातलेली ठाणे महापालिका (Thane Corporation Election) एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवणार असल्याची चर्चांना या ट्वीटनंतर उधाण आले आहे. (Eknath Shinde News In Marathi)

हेही वाचा: 'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात, मनसेचा शिवसेनेला चिमटा

सध्या एकनाथ शिंदेंसह साधारण 42 आमदार गुवाहटी येथे आहेत. अनेक आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. तर, शिंदेंनी आमची शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा दावा केला असून, काल मुख्यमंत्र्यांनी सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगलाही सोडला आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. त्यानंतर आता ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी एकनाथ शिंदेच्या समर्थन करणारे ट्वीट केले आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या ठाणे महापालिका निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Maharashtra Politics)

त्यात आता ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी ट्वीट करत आम्ही तुमच्यासोबत.......आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना असं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेली ठाणे महापालिका निवडणूक शिंदे यांच्या नेत्तृत्त्वाखाली लढवली जाणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या असून, असे झाल्यास सत्तांतरानंतर शिवसेना बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानावा लागेल.

Web Title: Uddhav Thackeray Thane Corporation Election Naresh Mhaske Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top