Sanjay Raut: उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी

संजय राऊतांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपा नेत्याने केलीय
Sanjay Raut
Sanjay RautEsakal

महाविकास आघाडीकडून शनिवारी मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिंदे गट आणि भाजपाच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलल्या आक्षेपार्ह विधानांच्या निधेषार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. परंतु सत्ताधारी शिंदे-भाजप यांच्याकडून या मोर्चावर टीका करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या या मोर्चाचा उल्लेख ‘नॅनो’ मोर्चा असा केला आहे.

या टीकेला उत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचे सर्व पदाधिकारी आणि फडणवीस यांनी केलेले विधान म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता नॅनो असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत महामोर्चातील गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओसोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा खोचक टोलाही राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

Sanjay Raut
Shivsena: काय होणार? उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पहिल्यांदाच येणार आमने-सामने!

तर हा संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चातला असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी या व्हिडिओवरून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी मराठा समाज, मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाचा अपमान केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे. सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत लाड यांनी ही मागणी केली आहे.

Sanjay Raut
Amol Kolhe: रावसाहेब दानवे अन् अमोल कोल्हेंच्या भेटीत अर्धा तास चर्चा; नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com