Uddhav Thackery: 'राज्यपाल म्हणजे....' ठाकरेंनी एका वाक्यात दिली सणसणीत चपराक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackery

Uddhav Thackery: 'राज्यपाल म्हणजे....' ठाकरेंनी एका वाक्यात दिली सणसणीत चपराक

Uddhav Thackery Shivsena leader comment: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ते वक्तव्य आणि राज्याच्या राजकीय, सामाजिक वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. आतापर्यत अनेक राजकीय व्यक्तींनी राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सडेतोडपणे टीका केली आहे.

राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी हे सध्या कमालीचे चर्चेत आहेत. तसे ते नेहमीच वेगवेगळया कारणासाठी लाईमलाईट असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर आपल्या खास ठाकरी शैलीत राज्यपालांवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, आपण काय बोलतो आहोत याचा विचार करण्याची गरज राज्यपालांना आहे. यापूर्वी देखील त्यांनी मुंबईविरोधात त्यांनी विधान केले होते. ज्यांना काही आगे पिछा नाही अशी लोकं राज्यपाल होत आहेत. आणि काही बोलत आहेत. सातत्यानं अपमान करायचा, आणि जनतेच्या मनात राग तयार करणे हे चूकीचे आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis: राज्यपालांवर देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? घेताहेत सावध भूमिका?

राज्याच्या अस्मितेशी खेळ केला जात आहे. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होतोय आणि कुणालाही काहीही देणे घेणे नाही. पक्ष आणि विचारसरणी यात राज्याचा अपमान होतोय. या सरकारला मुख्यमंत्री आहे की नाही, हेच कळत नाही. राज्यपालांनी केलेलं ते वक्तव्य म्हणजे, एखाद्या वृद्धाश्रमात देखील त्यांना जागा मिळणार नाही. ज्यांना वृध्दाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जात की काय असा प्रश्न पडला आहे. मी आता तमाम महाराष्ट्रप्रेमींना आवाहन करतो की, आपण या महाराष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. या शब्दांत ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Viral News: मृत बाळाला तोंडात घेऊन रुग्णालयात फिरत होता कुत्रा!