पदव्या घेऊनही वाढली बेरोजगारी, विकसित करा कौशल्य, मिळवा हमखास नोकरी

वयाची २५-२६ वर्षे नुसती शिक्षणातच गेली, अनेक पदव्या घेतल्या, लग्नाचे वय झाले, तरीपण नोकरी नाही! नोकरीच्या शोधात घर सोडले, पण अपेक्षा पूर्ण होतील असा जॉब मिळालाच नाही. त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले, काहीजण व्यसनाच्या आहारी गेले, तर काहींनी आत्महत्येचा देखील विचार केला.
student
studentsakal

सोलापूर : वयाची २५-२६ वर्षे नुसती शिक्षणातच गेली, अनेक पदव्या घेतल्या, लग्नाचे वय झाले, तरीपण नोकरी नाही! नोकरीच्या शोधात घर सोडले, पण अपेक्षा पूर्ण होतील असा जॉब मिळालाच नाही. त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले, काहीजण व्यसनाच्या आहारी गेले, तर काहींनी आत्महत्येचा देखील विचार केला. वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

स्थानिक उद्योजकांची गरज व स्कोप ओळखून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १३५ कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू झाले. तीन व सहा महिने किंवा एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केला आणि ७५ टक्के तरुण-तरुणींना नोकरी मिळाल्याची माहिती समन्वयक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली. सोलापूर विद्यापीठातील १०० कोर्सेसला दरवर्षी प्रवेश हाउसफुल्ल होतात. पारंपारिक शिक्षण घेत असताना हे कोर्स करता येतील, असेही ते म्हणाले. नोकरीच्या चिंतेतील तरुणांसाठी सोलापूर विद्यापीठाचा हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कौशल्य कोर्सेसबद्दल थोडक्यात...

  • कोर्सचा कालवधी

  • ३ महिने ते १२ महिने

  • शुल्क

  • २,००० ते १०,०००

  • दरवर्षीची प्रवेश क्षमता

  • १,७०० ते २,०००

  • पात्रता

  • बारावी ते कोणताही पदवीधर

हमखास जॉब देणारे कोर्स...

  • १) पॅरामेडिकल

  • आरोग्य सेवक, ऑपरेशन थिएटर सहायक, एक्स-रे तंत्रज्ञ, सिटी स्कॅन तंत्रज्ञ, डायलेसिस तंत्रज्ञ, योगा टीचर, क्रिटिकल केअर थेरेपी

  • २) कॉमर्स मॅनेजमेंट

  • स्टॉक मार्केट, डिजिटल मीडिया, जीएसटी टॅली

  • ३) कॉम्प्युटर कोर्सेस

  • टॅली ईआरपी, जीएसटी, हॅण्डूप ॲन्ड प्रोग्रामिंग

  • ४) ट्रॅडिशनल

  • ड्रेस डिझायनिंग, सर्टिफिकेट कोर्स इन टूरिझम, सर्टिफिकेट कोर्स इन जर्नालिझम, मॉन्टेसरी टीचर

  • ५) इतर कोर्सेस

  • जिओ इन्फॉर्मेशन, टेक्स्टाईल केमिस्ट्री, माहिती अधिकार कायदा प्रशिक्षण कोर्स, अँकरिंग (रेडिओ, टीव्ही, इव्हेंट), ॲग्रो टूरिझम, स्पोकन इंग्लिश कम्युनिकेशन, हेअर ॲन्ड स्किन मेकअप, किचन अँड टेरेस गार्डनिंन, फॅशन डिझायनिंग, सायबर लॉ आणि टॅक्सेशन लॉ.

शुगर अन्‌ टेक्स्टाईलला मिळणार कुशल मनुष्यबळ

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने आहेत. समाधानकारक पाऊस आणि उजनी धरणामुळे जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढू लागल्याने तरुणांना या क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी आहे. तसेच शहरातील गारमेंट, टेक्स्टाईल उद्योगाला लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या हेतूने विद्यापीठात आणखी काही कोर्सेस सुरू होणार आहेत. त्या कारखानदारांना विद्यापीठात बोलावून ‘कॅम्पस सिलेक्शन’चीही सोय केली जाणार आहे.

वृद्धांच्या सेवेतून रोजगाराची संधी

शिक्षण तथा नोकरीच्या निमित्ताने घरापासून कोसो दूर राहणाऱ्या मुलांचे वृद्ध माता-पिता घरी एकटेच असतात. वय झाल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील होते. या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध माता-पित्यांची सेवा करणारा ‘केअर टेकर’ हा कोर्स विद्यापीठात आगामी वर्षापासून सुरू केला जाणार आहे. त्यांचा डेटाबेस तयार करून मागणीनुसार त्या तरुणांना त्याठिकाणी पाठविले जाईल.

क्षणक्षणा हा चि करावा विचार...

‘क्षणक्षणा हा चि करावा विचार। तरावया पार भवसिंधु॥ नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान॥’ या अभंगातून संत तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक क्षणी मनुष्याने हाच विचार करावा, की आयुष्याचा भवसागर मी कसा पार करू शकतो. त्यासाठी स्वत:मधील कौशल्य विकसित करावेच लागतील, जेणेकरून आनंदी, समाधानी जगण्याचा मार्ग सापडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com