
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या प्रकल्पांबाबतची माहिती दिली. राज्यात सुरु असलेल्या प्रोजेक्टसाठी 5 हजार कोटींची मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज राज्यात सुरु अशलेल्या प्रोजेक्टसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या चर्चेनंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या प्रकल्पांबाबतची माहिती दिली. राज्यात सुरु असलेल्या प्रोजेक्टसाठी 5 हजार कोटींची मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या 523 प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यापैकी 194 प्रोजेक्ट पूर्ण झाले असून 305 प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर आहे. कामासाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. 496 किमीचे 2 लेनचं काम सुरू असून 2 हजार 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
हे वाचा - मध्य महाराष्ट्रासह कोकणात तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता;पुण्यात उन्हाचा चटका
मुंबई पुण्यातील प्रदुषणाचा प्रश्न सोडवण्यासाठीही एक विशिष्ट रोड तयार करण्यात येत असल्याचं गडकरी म्हणाले. या विशेष अशा रस्त्यासाठी 6 हजार कोटींचा खर्च येणार आहे. हा मार्ग सूरत - अहमदनगर - सोलापूर असा असणार आहे. सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर हौदरबाद चेन्नई असा मार्ग करत आहोत. यामुळे उत्तर दक्षिण वाहतूक वेगवान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यात दोन्ही पालखी मार्गांचे काम सुरु झाले असल्याचे ते म्हणाले. 3 PKG चे काम सुरू झाले असून 5 PKG चे काम सुरु होणार आहे. तसंच राहिलेलं काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे असंही गडकरींनी सांगितले. तसंच पुणे चांदणी चौकबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.
'आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे, पण...'; शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता
मुंबई गोवा महामार्गाचे कामही सुरू असून त्याबाबतही गडकरींनी माहिती दिली. हा महामार्ग एक वर्षाच्या आत पूर्ण होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. महामार्गाचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई गोव्यासाठी 180 किमी पूर्ण झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं.