esakal | नाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danve eknath khadse.jpg

त्यांचं संपूर्ण राजकीय करिअर भाजपत गेले आहे. काही कारणाने ते राजकीय मुख्य प्रवाहातून बाजूला पडले होते. त्यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्देवी आहे.

नाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडायला नको होता. त्यांचं संपूर्ण राजकीय करिअर भाजपत गेले आहे. काही कारणाने ते राजकीय मुख्य प्रवाहातून बाजूला पडले होते. त्यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्देवी आहे. पण नाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या राजीनाम्यावर दानवे बोलत होते. 

दानवे पुढे म्हणाले की, नाथाभाऊंबद्दल पक्षात कुणाचंच दुमत नव्हते. त्यांचे मन वळवण्याचे खूप प्रयत्न केले. त्यांची समजूत काढण्याचा पक्षाने प्रयत्न केला. त्यावेळी सर्व वाहिन्यांनी त्यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. त्यांनी पक्ष सोडायला नको होता. हा त्यांच्यासाठीही अत्यंत दुर्देवी निर्णय आहे.

हेही वाचा- खडसेंचा भाजपला ‘जय श्रीराम’, राष्ट्रवादीत प्रवेशाची केवळ औपचारिकता 

नाथाभाऊंबद्दल आमच्या मनात आदर नाही असं नाही. परंतु, आता ते ज्या पक्षात चालले आहेत, त्या पक्षानं त्यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. मला असं वाटतं आता नाथाभाऊ गेलेत, त्यांनी दिल्या घरी सुखी राहावं, असे ते म्हणाले.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी वाढली. नंतर राज्यसभा व विधानपरिषदेबाबत आश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजप नेतृत्वाला आव्हान दिले होते. 

हेही वाचा- वाढत्या 'लव्ह जिहाद'वर कोश्यारींशी चर्चा; महिला आयोगाच्या अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात

गेल्या महिन्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. शरद पवार यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करत चाचपणी केली, त्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी द्यावी, यावर गेल्या 15 दिवसांपासून खल झाला. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला असल्याचे बोलले जाते.

loading image