
Ladki Bahin Yojana Updates: महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली. याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला. त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. आता या योजनेचा पुढील हफ्ता लवकरच मिळणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणीसांठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींना आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.