esakal | आमच्या अनुभवाचा उपयोग करावा - चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok-Chavan

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच आम्हाला भेटीची वेळ देतील, अशी आम्हाला खात्री आहे. आमच्या प्रशासकीय अनुभवाची मदत हवी असल्यास आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत,’ असे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना नमूद केले.

आमच्या अनुभवाचा उपयोग करावा - चव्हाण

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच आम्हाला भेटीची वेळ देतील, अशी आम्हाला खात्री आहे. आमच्या प्रशासकीय अनुभवाची मदत हवी असल्यास आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत,’ असे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्न : राज्याचे एकेकाळचे प्रमुख या नात्याने आपण उद्धव ठाकरे यांना काही सल्ला द्याल काय?
अशोक चव्हाण : प्रशासनाबाबत आम्हाला काँग्रेस म्हणून किंवा माजी मुख्यमंत्री या नात्याने काही विचारले तर मी जरूर सांगेन. त्यांना योग्य वाटत असल्यास आम्ही मदत करायला तयार आहोत. प्रशासनात काही बदल करणे आवश्यक आहे. 

गरिबांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी काही उपाय सुचवले आहेत.
गरिबांना योजनेचे लाभ मिळावेत यासाठी ‘न्याय’ ही योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मांडली होती. ती लागू करा, गरिबांच्या हाती रक्कम द्या, अशी आमची मागणी आहे.

सोशल मीडियावर तरुणाईंकडून 'या'चा वापर वाढतोय, कोणत्या आहेत त्या गोष्टी, जरुर वाचाच...

मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र आघाडी होईल का?
काँग्रेसचे बलस्थान असलेल्या जागा देण्याचा निर्णय घेतला, तर तसा विचार करता येईल.

विधान परिषद निवडणुकीत न्याय मिळावा, असा आग्रह का?
महाविकास आघाडी ही समसमान तत्त्वावर झाली असल्याने आम्हाला चार जागा मिळायला हव्यात. भाजपविरोधासाठी आम्ही जे मिळतेय ते घेत राहून या सरकारमध्ये राहू, असे समजू नये. आघाडी सरकारमध्ये सर्वांना समवेत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करतील यावर विश्वास ठेवू.

तब्बल 1328 मृत्यूंची नव्याने नोंद, मृतांच्या आकडेवारीत घोळ अखेर दूर...

आपण स्वतः कोरोनाची शिकार झालात. लढण्यासाठी काय सल्ला द्याल?
हा आजार परतवून लावता येतो. सामना करण्यासाठी जिद्द आवश्यक असते. लोकांनी घाबरून जाऊ नये.

loading image