तब्बल 1328 मृत्यूंची नव्याने नोंद, मृतांच्या आकडेवारीत घोळ अखेर दूर...

तब्बल 1328 मृत्यूंची नव्याने नोंद, मृतांच्या आकडेवारीत घोळ अखेर दूर...

मुंबई : मुंबईसह राज्यातील कोविड 19 ने दगावलेल्या रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ अखेर दूर झाला असून नव्याने 1328 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सरकार मृतांची आकडेवारी लपवत असक्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती.

देशातील सर्वात अधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात कोविडच्या आकडेवारीत गोंधळ असल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 जूनपर्यंत सर्व डेटा सादर करण्यास सांगितले होते. एकदा डेटा सादर झाल्यानंतर या प्रकरणात राज्य अधिकारी  डेटाची तपासणी करतील आणि तो दुरुस्त प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले होते. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत कोविडच्या नेमके प्रकरणांचे स्पष्ट चित्र समोर येईल.

राज्य सरकारच्या निदर्शनास आले की कोविड रुग्णांचा डेटा रेकॉर्ड करताना अनेक वेळा रुग्णांच्या नोंदी नोंदवलेल्या नसतात. बर्‍याच घटनांमध्ये, हे लक्षात आले की रुग्ण कोविड पॉझिटिव्ह होता आणि कॉमर्बिडिटीमुळे त्याचा मृत्यू झाला. कोविड रूग्णांचा डेटा फाईल अप करतांना, कधीकधी रुग्णालयांकडून तपशील चुकीचा जात असल्याने बर्‍याचदा गोंधळाचे वातावरण तयार होते. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर आता युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिका्यांना आपापल्या जिल्ह्यातील आकडेवारी तपासण्यास सांगितले होते. त्यात आम्हाला काही तफावत आढळली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आम्ही सर्व आकडेवारी तपासून कुठे काही चूक झाली आहे की ते तपासू. मात्र आकडेवारीबाबत आताच काही भाष्य करणे योग्य नसल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी  "मुंबईत 950  हून अधिक कोविड -19 मृत्यू लपवले असल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाईची मागणी केली होती.तसेच अचूक संख्या लवकरात लवकर जाहीर करा अशी मागणी ही केली होती.14 जूनपर्यंत मुंबई शहरात 58,135 कोविड पॉझिटिव्ह आणि 28,959 सक्रिय प्रकरणे नोंदली गेली. त्याच दिवशी राज्यात 1,07,958 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

राज्य सरकारने याबाबत स्पष्ट करतांना सांगितले की जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर स्टडीज डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या आयसीडी10 मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही केली जाते. राज्यातील मृत्यूची तपासणी केल्यानंतर मुंबई महापालिका क्षेत्रात 862 तर 466 प्रकरण अन्य जिल्हा तसेच महापालिका क्षेत्रात आढळली आहेत. मृत्यू समयी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने या सर्व प्रकरणांची नोंद 'डेथ इन कोविड पॉझिटिव्ह केस ' म्हणून करण्यात आली आहे.

  • मुंबई - 862
  • अहमद नगर -1
  • अकोला -14
  • अमरावती - 6
  • औरंगाबाद - 33
  • बुलडाणा - 2
  • धुळे - 12
  • जळगाव - 34
  • जालना - 4
  • लातूर - 3
  • नांदेड - 2
  • नाशिक - 28
  • उस्मानाबाद - 3
  • पालघर - 11
  • परभणी - 1
  • पुणे - 85
  • रायगड - 14
  • रत्नागिरी - 1
  • सांगली - 4
  • सातारा - 6
  • सिंधुदुर्ग - 3
  • सोलापूर - 51
  • ठाणे - 146
  • वाशीम - 1
  • यवतमाळ - 1

1328 new deaths registered confusion over deaths is now cleared

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com