'केंद्रानं लहानांसाठी लसीचा बुस्टर डोस देण्याची तयारी दाखवावी'

ओमिक्रॉन संदर्भात 10 पॉझिटिव्ह रुग्ण असून या रुग्णांची तब्बेत ठीक आहे.
rajesh tope
rajesh topesakal media
Summary

ओमिक्रॉन संदर्भात 10 पॉझिटिव्ह रुग्ण असून या रुग्णांची तब्बेत ठीक आहे.

देशासह राज्यात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आरोग्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ओमिक्रॉन संदर्भात 10 पॉझिटिव्ह रुग्ण असून या रुग्णांची तब्बेत ठीक असल्याची दिलासादायक माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात एका दिवसाला आता 8 लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे, अशी माहीतीही त्यांनी यावेळी दिली आहे.

rajesh tope
हेलिकॉप्टर अपघात : CDS बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर

ओमायक्रॉन संदर्भात राज्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. राज्यात एका दिवसाला आता 8 लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र केंद्र सरकारने लहान मुलांचे लसीकरण, बूस्टर डोस देण्याची तयारी दाखवावी. ठिकठीकाणी विमान तळावरील स्क्रिनिंग अधिक काळजीने केले जात आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. विमान तळावरील RTPCR टेस्टची किंमत कमी करण्यासाठी आज बैठक घेतली जाणार आहे. भीतीपोटी लोक समोर येत नाहीत, पण मिसिंग लोकांना शोधले जात आहे. केंद्रीय मंत्री मानसुख मांडवी हे उद्या यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेणार आहेत. उद्या आम्ही आमचे मुद्दे मांडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

यावेळी ओबीसी आरक्षणा विषयी ते म्हणाले, इतर राज्यात ओबीसी आरक्षण 27 टक्के आहे. त्यापद्धतीने राज्यातील निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. राज्यसरकार एक अफिडेव्हिडं देणार आहे ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

rajesh tope
हेलिकॉप्टर अपघात : CDS बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com