ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार| Ramesh Deo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Ramesh Deo

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Actor Ramesh Deo) यांचे काल निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव (Ajikya Deo) यांनी याबाबत माहिती दिली आहे. 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Veteran Actor Ramesh Deo Passes Away)

हेही वाचा: सदाबहार अभिनयाचं विद्यापीठ! अशी होती रमेश देव यांची फिल्मी कारकिर्द

रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला होता. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव 'देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला व पडद्यावर आणि आयुष्यातही जोडी जमली.

हेही वाचा: Image Story: सदाबहार अभिनेते रमेश देव यांचा चित्रमय प्रवास

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचं नाव आदराने घेतले जातं. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 180 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले होते.

हेही वाचा: 'तूला पाहते रे तूला पाहते' रमेश देव-सीमा देव यांच्या प्रेमाची कहाणी

1951मध्ये केले अभिनय क्षेत्रात पदार्पण

अभिनेते रमेश देव यांनी 1951 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पाटलाची पोर या चित्रपटात देव यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी 1956 मध्ये राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Web Title: Veteran Actor Ramesh Deo Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..