'तुला पाहते रे तुला पाहते'; रमेश देव-सीमा देव यांच्या प्रेमाची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ramesh Deo and  Seema Deo

'तुला पाहते रे तुला पाहते'; रमेश देव-सीमा देव यांच्या प्रेमाची कहाणी

मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Veteran Actor Ramesh Deo ) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. रमेश देव यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) (Seema Deo) यांच्यासोबत विवाह केला. रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्या वयात 14 वर्षांचे अंतर होते. या दोघांनी 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटात पहिल्यांदा सोबत काम केल्याचे पाहायला मिळाले. (Ramesh Deo Seema Deo Love Story)

रमेश देव (Ramesh Deo )यांनी 1950 मध्ये मराठी चित्रपटातून (Marathi Movie) आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी काही हिंदी चित्रपटात सह कलाकाराच्या भूमिकेत काम केले. त्यांची चित्रपट कारकिर्दी बहरत असताना दुसऱ्या बाजूला नलिनी सराफ यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चित्रपटासाठी त्यांनी सीमा या नावाने कारकिर्दीला सुरुवात केली 1960 मध्ये 'जगाच्या पाठीवर' या मराठी चित्रपटातून या जोडीनं एकत्र काम केले. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

1962 मध्ये त्यांनी 'वरदक्षिणा' या चित्रपटात ही जोडी पुन्हा झळकली. या चित्रपटापासूनच दोघांच्या नात्यातील प्रेम फुलण्यास सुरुवात झाली. त्याच वर्षी अभिनय क्षेत्रातील नावजलेली जोडीनं विवाहही थाटला. 2013 मध्ये या जोडीच्या विवाहाला 50 वर्षे पूर्ण झाली होती. 50 वर्षानंतरही त्यांच्या नात्यातील गोडवा एखाद्याला हेवा वाटावा असाच होता. रमेश देव यांनी 280 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा: सदाबहार अभिनयाचं विद्यापीठ! अशी होती रमेश देव यांची फिल्मी कारकिर्द

Web Title: You Know Veteran Actor Ramesh Deo And Seema Deo Love Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..