

Maharashtra
esakal
पुणे: विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती रविवारीही कायम होती. आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
आज ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, चंद्रपूर (४५.६), वर्धा (४५.५), नागपूर (४५.४) आणि अमरावती (४५.२) येथेही पारा ४५ अंशांच्या वर गेला होता.