Vidarbha weather forecast
esakal
देशाच्या अनेक भागांत सध्या पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या उत्तर-पूर्व मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने उत्तर प्रदेशसह पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.