
अजूनही मला पोलिसांनी एफआयरची प्रत दाखवली नाही - जयश्री सदावर्ते
वादग्रस्त वक्तव्यांच्या 'त्या' व्हिडिओ क्लिप्समुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होणार?
राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी आज रात्री ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्या घरी रात्री पोलिस दलातील ४-५ कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी अजूनही मला पोलिसांनी एफआयरची प्रत दाखवली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या दबावखाली सदावर्ते यांना ताब्यात घेतले असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर आली आहे.
हेही वाचा: 'पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय, यामागे कोण हे शोधून काढा'
गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल सदावर्ते यांच्या चौकशीमध्ये मागील भाषणा दरम्यानच्या काही व्हिडिओ क्लीप्स मिळाल्यानं ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. गुणवर्त सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडत असताना काही वादग्रस्त वक्तव्य आणि भाषण केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे सदावर्ते यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर "माझी हत्या होऊ शकते" असे उद्गार काढले आहेत. ते म्हणाले की, मला नोटीस न देता अटक करण्यात आली आहे. आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर माझ्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे." असं सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर बोलत होते. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना जोर धरला आहे.
हेही वाचा: गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Web Title: Video Clips Of Gunratna Sadavarte Creates Problem In St Employees Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..