पैशांच्या गड्ड्यांसोबत खेळणारे आमदार कोण? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, ३ व्हिडीओ पोस्ट केल्यानं खळबळ

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ३ व्हिडीओ पोस्ट करत पैशांच्या गड्ड्यांसोबत हा आमदार कोण असा प्रश्न विचारलाय. ऐन अधिवेशनाच्या काळात या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
Ambadas Danve

Ambadas Danve Questions Who Is the MLA Playing with Cash Bundles

Esakal

Updated on

Ambadas Danve: ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब टाकलाय. व्हिडीओ ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्‍यांना प्रश्न विचारलाय. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, ते आमदार कोण असा प्रश्न अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. विधानसभेचं हिवाळी अधिवेशना नागपुरात सुरू असतानाच अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओंमुळे खळबळ उडालीय. विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा आज विधानसभेत गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब टाकलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com