esakal | Vidhan Sabha 2019 : खडसे, तावडे, बानवकुळेंचे काय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 maharashtra bjp candidates list eknath khadse vinod tavde chandrashekhar bavankule

मुंबई : भाजपने आज विधानसभा निवडणुकांसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली. त्यात चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे या तीन नेत्यांची नावे नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत या नेत्यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आता तिसऱ्या यादीतही त्यांची नावे नसल्याने भाजप कार्यकर्तेच नव्हे, विरोधकांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.

Vidhan Sabha 2019 : खडसे, तावडे, बानवकुळेंचे काय होणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भाजपने आज विधानसभा निवडणुकांसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली. त्यात चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे या तीन नेत्यांची नावे नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत या नेत्यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आता तिसऱ्या यादीतही त्यांची नावे नसल्याने भाजप कार्यकर्तेच नव्हे, विरोधकांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे. यात बावनकुळे यांच्या कामाठी, तावडे यांच्या बोरीवली आणि खडसे यांच्या मुक्ताईनगर या तिन्ही मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे या तीन बड्या नेत्यांची तिकिटे कापली जाणार की, त्यांना पुन्हा संधी मिळणार याविषयी सस्पेन्स कायम आहे.

महाजन म्हणतात, 'खडसे नाराज नाहीत'

एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला
भाजपने आपली 125 उमेदवारांची पहिली यादी 1 ऑक्टोबर रोजी जाहीर केली होती. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नव्हते. योगा योगाने त्याच दिवशी दुपारी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही तरीही मी अर्ज दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी यावेळी होती. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत त्यांना स्थान मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. पण, तसे झालेली नाही. आता पक्षा घेईल तो निर्णय मान्य, अशी भूमिका खडसे यांनी जाहीर केली आहे. भाजपने अद्याप त्यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारासंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही.

तिसऱ्या यादीतही खडसेंचे नाव नाही

विनोद तावडे यांची प्रतिक्रियाच नाही
भाजपकडून विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करणारे विनोद तावडे यांनी 2014मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. बोरीवली सारख्या भाजपसाठीच्या सुरक्षित मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले. त्याआधी गोपळ शेट्टी त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. गोपाळ शेट्टी लोकसभेत गेल्यानंतर त्या मतदारसंघात तावडे यांनी निवडणूक लढवली होती. मंत्रिमंडळात त्यांना उच्च व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी मिळाली. पण, सुरुवातीपासूनच त्यांच्या विषयी वाद निर्माण झाले. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी घेतल्याचा दावा तावडे यांनी केला होता. तात्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अद्याप उमेवारी जाहीर न झाल्याबद्दल विनोद तावडे यांनी कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीत रोजंदारी कामगार?

बावनकुळे यांचे काय?
भाजप नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमधील कामाठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या मतदारसंघातून त्यांनी तीनवेळा विजय मिळवला आहे. परंतु, मंत्रिमंडळात ते आपल्या कामाची छाप पाडण्यात अपयशी ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या तिकिटाला विलंब झाल्याचे बोलले जात आहे.