Vidhan Sabha 2019 : भाजपने 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता केला कट!

टीम ई-सकाळ
Friday, 4 October 2019

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज, सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात धक्कादायक म्हणजे, चार मंत्र्यांना घरी बसवण्यात. यातील तीन मंत्र्यांची नावे किमान चौथ्या यादीत तरी, समाविष्ट केली जातील, अशी शक्यता होती. पण, अखेर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

भाजपची शेवटची यादी जाहीर; खडसे, तावडेंना डावलले

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज, सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात धक्कादायक म्हणजे, चार मंत्र्यांना घरी बसवण्यात. यातील तीन मंत्र्यांची नावे किमान चौथ्या यादीत तरी, समाविष्ट केली जातील, अशी शक्यता होती. पण, अखेर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

भाजपची शेवटची यादी जाहीर; खडसे, तावडेंना डावलले

काय झाले तावडेंचे?
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश यांच्या उमेदवारीची घोषणाच न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातही विनोद तावडे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आग्रही असल्याची चर्चा होती. पण, भाजपच्या वरिष्ठांनी त्यांच्या नावाला नकारच दिल्याचे स्पष्ट होत आहे. पूर्वी विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या तावडे यांनी 2014मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. भाजपचे मुंबईत उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले. पण, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून उठलेला वाद, पाच वर्षांत त्यांच्या कारभारावर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे तावडे यांच्या प्रतिमेला तडा गेल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे नाराज, राष्ट्रवादीच्या संपर्कात

खडसे, मेहतांचा पत्ता का केला कट?
एकनाथ खडसे यांच्यावर फडवणीस यांच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी होती. त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण, पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन गैव्यवहाराचे त्यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं. पहिल्या यादीत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. पण, त्यांनी त्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे खडसे गेले दोन दिवस नाराज असल्याची चर्चा होती. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी खडसे नाराज नसल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. पण, खडसे यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी यांना भाजपने उमेदवारी जाहीर करून, खडसेंना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता जळगावमधील मुक्ताईनगरमधून खडसे यांची कन्या रोहिणी या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

बानवकुळे होल्डवर 
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात प्रकाश मेहतांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. त्यावेळी भाजपने त्यांची पाठराखण केली. पण, निवडणुकीत त्यांचा पत्ता कापला. मेहता यांनी एकेकाळी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषविले होते. मेहता यांच्या घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मेहता यांच्या जोडीला मुंबईतील भाजपचे नेते राज पुरोहित आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नावेही चौथ्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बानवकुळे यांच्या कामठी मतदारसंघातील भाजपची उमेदवारी होल्डवर ठेवण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 bjp fourth candidate list not named vinod tawde eknath khadse