Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीसांच्या उमेदवारी अर्जावर देशमुख, पवारांचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या प्रतिपत्रावर जुन्या तारखेचाच शिक्का असल्याचा देशमुख आणि पवार यांचा आक्षेप आहे.

डॉ. आशिष देशमुख आणि प्रशांत पवार यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यावर आता 4 वाजता तहसील कार्यालयात सुनावणी होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याची चर्चा शहरात थांबते न थांबते तोच. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात नानाविध चर्चा सुरु झाल्या आहे.

Vidhan Sabha 2019 : पंढरपूरच्या जागेवर काँग्रेस ठाम

आता थोड्याच वेळात यावर सुनावणी होणार असल्याने राजकीय मंडळींचे त्याकडे लक्ष लागले आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याही प्रतिज्ञापत्रावर जुनीच तारीख पडली होती. 

टिकटॉक व्हिडिओ पाहत थांबलेल्यावर सांगवीत गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Deshmukh And Prashant Pawar file objection on CM Fadnavis Candidacy form vidhan sabha 2019