Vidhan Sabha 2019 : राहुल गांधी आहेत कुठं? महाराष्ट्रात दौरा कधी?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून कुठल्याच चर्चेत दिसत नव्हते. 2 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी वर्धा येथे गांधी सेवाग्रामला भेट देणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांचा दौरा रद्द झाला. आता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा दौरा निश्चित झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून कुठल्याच चर्चेत दिसत नव्हते. 2 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी वर्धा येथे गांधी सेवाग्रामला भेट देणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांचा दौरा रद्द झाला. आता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा दौरा निश्चित झाला आहे.

'अजित पवारांनी केली राणेंकडे पैशांची मागणी'

राहुल गांधी वायनाडमध्ये
राहुल गांधी आज, त्यांच्या केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘अर्थव्यवस्था हीच देशाची सर्वांत मोठी ताकद होती. ही ताकदच नष्ट करण्याचं काम, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भाजपने केलंय. जीडीपी कुठे दिसेनाच झाला आहे. बेरोजगारीने डोके वर काढले आहे. 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची कर सवलत सरकार केवळ 15 उद्योगपतींना देत आहे. तर, दुसरीकडे केरळच्या जनतेला मनरेगाच्या पैशांची मागणी करावी लागत आहे. देशात हे काय सुरू आहे.? भाजपने याचं स्पष्ट उत्तर द्यावं. हे देशा काही 15-20 जणांचाच आहे का? देशातल्या इतर जनतेचं काय? देशातील मजूर वर्गाचं काय? विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्या रोजगाराचं काय? देशात हेच आज सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यावर कोणीही सध्या बोलत नाही. भाजपने यावर स्पष्ट उत्तर द्यावं.’

विश्वजीत कदम यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज

आशिष शेलार कोणाला म्हणाले, ‘आता बसा रडत!’​

10 ऑक्टोबरपासून प्रचार
दरम्यान, राहुल गांधी येत्या 10 ऑक्टोबरपासून 19 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करणार आहेत. त्यात महाराष्ट्रात कधी प्रचार करणार? याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. राहुल गांधी यांच्या वर्धा दौरा रद्द झाल्यानंतर ते विधानसभा निवडणुकांचा प्रचारच करणार नाहीत, अशी चर्चा काही इलेक्ट्रिक माध्यमांनी सुरू केली होती. आता, राहुल यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर त्या चर्चेवर पडदा पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress leader Rahul Gandhi to campaign maharashtra elections