esakal | वडेट्टीवार यांनी सरकार स्थापनेबाबत केले वक्तव्य, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

वडेट्टीवार यांनी सरकार स्थापनेबाबत केले वक्तव्य, म्हणाले...

-  राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, अशी सर्व शेतकऱयांची मागणी

वडेट्टीवार यांनी सरकार स्थापनेबाबत केले वक्तव्य, म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेतेमंडळींकडून चर्चा आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. आता याच मुद्द्यावरून महाशिवआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, की राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, अशी सर्व शेतकऱयांची मागणी आहे. तसेच आज झालेल्या चर्चेतील तपशील हायकमांडला पाठविणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अद्यापही राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. असे असताना आज मुंबईतील एमईटी संस्थेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, माणिकराव ठाकरे, नवाब मलिक आणि विजय वडेट्टीवार हजेरी लावली. 

पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख

त्यानंतर या बैठकीबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, अशी सर्व शेतकऱयांची मागणी आहे. सरकार स्थापनेबाबत वरिष्ठ नेते, पवारसाहेबांनी लवकर निर्णय दिला तर राज्यात सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आमचे उद्दिष्ट फक्त सरकार बनविणे नसून ते चांगलं चालंल पाहिजे, असे आहे. 

Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...

ड्राफ्ट हायकमांडला पाठविणार

आज झालेल्या चर्चेतील तपशील हायकमांडला पाठविणार आहे. समान किमान कार्यक्रमावर चर्चा झाली. या चर्चेचा ड्राफ्ट हायकमांडला पाठविणार असून, हायकमांडच यावर निर्णय घेणार आहे. त्यानंतर अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आता चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे, असेही ते म्हणाले.