
Vinayak Mete Death : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आज त्यांच्या पार्थिवावर बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, दरेकर, बावनकुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले. बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं. त्यांनी अखेर मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
अपघात कसा घडला कळलं पाहिजे, पत्नी ज्योती मेटेंची चौकशीची मागणी
मेटे यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी मी करणार आहे. कारण त्याच्यामध्ये काही फॉलप्ले नसला तरी मला हे कळण गरजेचं आहे की नेमका अपघात कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर आम्हाला त्यांनी माहिती दिली आहे, असे ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.
विनायक मेटेंच्या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात
विनायक मेटे यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी अपघाताची माहिती दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याचा तपास केला. ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रक चालकाचे नाव उमेश यादव असे सांगितले जात आहे. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरात मधील वापी येथे रवाना झाले होते. ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.