Vinod Tawade : आईच्या निधनानंतर केलं त्वचादान; विनोद तावडे व कुटुंबाचा कौतुकास्पद निर्णय

तीन दिवसांपूर्वीच तावडे यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं.
Vinod Tawde and his mother
Vinod Tawde and his motherSakal

भाजपा नेते विनोद तावडे यांच्या मातोश्रींचं तीन दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तावडे कुटुंबीयांनी त्वचादानाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्वचादानाचा निर्णय तावडे कुटुंबीयांनी घेतला. तावडे यांनी अवयवदानाबद्दलची माहिती आपल्या सहकाऱ्यांसोबत तसंच मित्रमंडळींसोबत शेअरही केली.

Vinod Tawde and his mother
Eknath Shinde : "आम्ही आहोत..."; लाँग मार्चमधल्या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला Cm शिंदेंचा भावनिक आधार

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या आई विजया श्रीधर तावडे यांचं मुंबईत निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विनोद यांच्यासह विलास आणि विवेक अशी तीन मुले, कन्या जयश्री, सुना आणि मोठा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com