Marathi Viral Video : 'पाणी नाही तर पानीच!' पुणेकरांनी जर चिडवलं तर हा व्हिडिओ नक्की दाखवा

पाणी की, पानी हा वाद आजचा नाही तर फार जूना आहे.
Marathi Viral Video
Marathi Viral Videoesakal

Viral Video On Marathi Language Correct Pronunciation : आपल्याकडे मराठी भाषा ही फार लवचिक आहे असं म्हटलं जातं, नुसतं शब्दांवर दिल्या जाणाऱ्या जोरामुळे सुद्धा एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात. शहाणा आहेस या दोन शब्दांचं वाक्य अनेक अर्थांनी वापरलं जातं.

पण यात न आणि ण या अक्षरांसाठी मात्र बराच आग्रह आणि वाद दिसून येतो. कुठे न वापरावा अन् कुठे ण यावरून बऱ्याचदा चीडवाचीडवी व आग्रही भूमिका दिसते. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या तरुणांना फक्त न की, ण हे उच्चार नीट जमत नाही त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा परिस्थितीत समोर आलेला हा व्हिडीओ अनेकांसाठी नक्कीच दिलासा ठरू शकतो. बघा तुम्हाला काय वाटतं...

याविषयीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पाणी योग्य की पानी असा प्रश्न अनेकदा समोर येतो. ग्रामीण भागात पानी म्हणतात तर शहरी प्रमाण भाषेत तो पाणी म्हटला जातो. आपण लहानपणापासून पुस्तकांमध्येहा पाणीच शिकलेलो असतो.

पण या इंस्टाग्रामवर विचारवेड या पेजवर पोस्ट झालेल्या या व्हिडीओमध्ये तज्ज्ञ काहीतरी वेगळंच सांगत आहेत. सर्व भाषांची जनन असलेल्या संस्कृत भाषेला प्रमाण धरत त्यांनी पाणी आणि पानी या शब्दांमधला भेद स्पष्ट करून दाखवला आहे.

Marathi Viral Video
Video Viral : नवरदेवाचा भन्नाट डान्स; अख्ख्या वऱ्हाडाला नाचवलं आपल्याच तालावर

या व्हिडीओमध्ये हेमंत राज्योपाध्ये आपल्याला पाणी आणि पानी शब्दातल्या भेदाविषयी सांगत आहेत. हेमंत हे स्वतः सर्जनशील लेखक, गीतकार, कॉपी-लेखक आहेत. शिवाय मराठी आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक आहेत. भारतशास्त्रज्ञ, संस्कृतशास्त्रज्ञ या विषायात त्यांनी अभ्यास केला आहे. जॉर्ज ऑगस्ट विद्यापीठ, गॉटिंगेन येथे डॉक्टरेट फेलो. दक्षिण आशियाच्या धार्मिक, सामाजिक-राजकीय इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांना हिंदू धर्म, बौद्ध धर्म, भारत, महाराष्ट्र, पाकिस्तान, वेद, संस्कृत, मराठी, इतिहास, दक्षिण आशियाई इतिहास, भारतशास्त्र, धार्मिक मानववंशशास्त्र या विषयांत विशेष रस आहे.

ते म्हणतात, शहरी प्रमाण मराठी भाषा ही संस्कृत व्याकरणावर बेतलेली असते. पण संस्कृत व्यकरणात पाणी हा शब्द पानीय या संस्कृत शब्दावर आधारीत आहे. त्यामुळे पानी हा ग्रामीण भाषेत वापरला जाणारा शब्द खरतर संस्कृत नीष्ठ आहे. तर शहरी प्रमाण भाषेतला पाणी हा शब्द संस्कृत नीष्ठ नाही.

असे बरेच शब्द आहेत जे उगाच आपण शुद्धतेच्या चौकटीत अडकवून ठेवतो. खर जर आपल्याला मराठी टिकवायची असेल तर ती वाहती राहिली पाहिजे. कोणत्याही भाषेतील शब्दांचे वेगवेगळे व्हर्जन्स उच्चार असतात. सगळ्या शैलिंमुळे मराठीचं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे. जर भाषा वाहती राहिली तरच ती टिकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com